अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी एकाला अटक

July 14, 2012 9:36 AM0 commentsViews: 3

14 जुलै

उस्मानाबादमध्ये गडदेवदरी गावात छेड काढल्यामुळे एका चौदा वर्षाच्या मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आता आरोपी लखन आढाव या 22 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आणि चौकशीनंतर लखनला अटक करण्यात आली. छेड काढल्यानंतर दुखावलेल्या या मुलीनं स्वत:ला जाळून घेतलंय. यात ती मुलगी 70 ते 80 टक्के भाजलीय. तिला उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

close