भर रस्त्यावर 20 तरुणांकडून मुलीची छेडछाड, 4 जणांना अटक

July 13, 2012 11:01 AM0 commentsViews: 18

13 जुलै

आसामची राजधानी गुवाहाटीत 20 जणांच्या समुहानं भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपुर्वीची ही घटना आहे. ही मुलगी आपल्या मित्रांसोबत रात्री वाढदिवसाची पार्टी करुन घरी परतत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलानी या मुलीवर अश्लील शेरेबाजी केली, त्यावरुन दोघामध्ये वाद झाला. या वादानंतर जवळच उभ्या असलेल्या 20 तरुणांनी या मुलीवर हल्ला केला. तिचा विनयभंग केला, मारहाण केली हे नराधम एवढ्यावरच थांबले नाही तर या मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्नही केला. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार भर रस्त्यावर सुरु असताना कुणीही या मुलीच्या बचावासाठी आलं नाही. दरम्यान, या घटनेची व्हिडीव्होग्राफी क रण्यात आली होती हा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केल्यानंतर झालेला प्रकार समोर आला. पोलिसांनी फुटेजच्या साह्यानं 7 आरोपींची ओळख केली आहे. मात्र 20 जणांपैकी फक्त 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

close