कलमाडींना लंडनला जाण्यास परवानगी

July 13, 2012 11:18 AM0 commentsViews: 2

13 जुलै

कॉमनवेल्थ घोटाळ्यातीले मुख्य आरोपी सुरेश कलमाडी यांना लंडन ऑलिम्पिकसाठी जाण्यास परवानगी मिळवली आहे. पतियाळा हाऊस कोर्टाकडे कलमाडींनी परवानगी देण्यात यावी यासाठी अर्ज दाखल केला होता. 26 जुलैला ते ऑलिम्पिकसाठी लंडनला जाणार आहेत. सीबीआयचा युक्तीवाद कोर्टाने नाकारला आहे. कलमाडी हे ऐथलिटिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहे. ऑलिम्पिकसाठी त्यांना निमंत्रण आलं आहे. त्यामुळे त्यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. कलमाडींना कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी जोपर्यंत सुरु राहिलं तोपर्यंत देश सोडून जाता येणार नाही असा आदेश कोर्टाने दिला होता. तसेच कलमाडींचा पासपोर्टही कोर्टाकडे जमा आहे. मात्र कलमाडींनी अखेर ऑलिम्पिकला कोर्टाने परवानगी दिली आहे.

close