मी लंडन ऑलिम्पिकला जाणारच – कलमाडी

July 14, 2012 12:20 PM0 commentsViews: 1

14 जुलै

मला ऑलिम्पिकला जाण्याचा पूर्ण अधिकार आहे.माझ्याविरोधातले आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत आणि लंडनला जाण्यासाठी मला क्रीडा मंत्री अजय माकन यांच्या परवानगीची गरजही नाही असं म्हणतं आज सुरेश कलमाडींनी अजय माकन यांना प्रत्त्युत्तर दिलंय. माकन यांच्यामुळे क्रीडा क्षेत्रात अनेक समस्या निर्माण होत आहेत. याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे माकन यांचा राजीनामा मागणार असल्याचंही कलमाडींनी सांगितलं. मी एशियन ऍथलेटीक असोसिएशनचा अध्यक्ष या नात्यानं लंडनला जाणार असल्याचं कलमाडींनी स्पष्ट केलंय.

close