मुलींना हवा सरकारी नोकरीतला नवरा

November 26, 2008 1:42 PM0 commentsViews: 10

26 नोव्हेंबर, मुंबईविनिता सिंगजागतिक मंदीचा परिणाम आता चक्क मॅट्रीमोनिअल साईट्सवर दिसतोय. लग्नासाठी उभं राहणार्‍या मुली आय.टी प्रोफेशनल ऐवजी सरकारी नोकरी करणार्‍या मुलांना प्राधान्य देतायेत. मंदीच्या लाटेनंतर आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी कमी झाल्यात आणि त्यामुऴे सरकारी नोकरी करणारा नवराचं बरा असं या मुलींना वाटतंय.आपला नवरा आयटी क्षेत्रात काम करणारा हवा, असं काही दिवसांपूर्वी अनेक मुलींना वाटत होतं. मात्र जागतिक मंदीमुळं अनेकांच्या नोकर्‍या जातायत. त्यामुळे त्यांचा विचार बदललाय. आता त्यांना हवाय सरकारी खात्यात नोकरी करणारा मुलगा.जागतिक मंदीच्या बातम्यांनी जोत्स्नासारख्या अनेक मुलींना विचार करायला भाग पाडलंय. मुलींप्रमाणेच तरूण मुलंही नोकरी करणार्‍या मुलींनाचं पसंती देतायत. मॅट्रीमोनिअल्सच्या वेबसाईटस्‌वर सरकारी, शैक्षणिक तसंच हेल्थ सेक्टर्समध्ये नोकरी करणारी मुलंच सध्या पसंती मिळवत आहेत. "आज ज्या मुलांकडे सरकारी नोकरी आहेत अशा मुलांना मोठी मागणी आहे. पूर्वी ज्याप्रमाणे सेफ नोकरी म्हणून बघितलं जायचं, तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे" असं शादी डॉट कॉमचे बिझनेस हेड विभाष मेहता यांनी दिली.मागील दोन महिन्यात मॅट्रीमोनिअल्स वेबसाईटस्‌वर बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधल्या मुलांसाठी आठ टक्क्यांपेक्षाही जास्त सर्फिंग झालंय. त्याशिवाय सरकारी खात्यात काम करणार्‍या मुलांना या साईटवर वीस टक्क्यांपेक्षाही जास्त मागणी आहे. पण जागतिक मंदीचा फटका आयटी क्षेत्रावर फार काळ टिकणार नाही. त्यामुळं आयटी क्षेत्रात काम करणार्‍या मुलांनाही लवकच चांगल्या मुली मिळतील, असंही बोललं जात आहे.

close