उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी यूपीएचे उमेदवार

July 14, 2012 4:04 PM0 commentsViews: 2

14 जुलै

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुसाठी यूपीएकडून हामिद अन्सारींचं नाव जाहीर झालंय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. तृणमुलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा विरोध असतानाही अन्सारींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अन्सारींच्या नावावर एकमत निर्माण व्हावं, यासाठी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी काही वेळापूर्वीच विरोधी पक्षातील भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांच्याशी फोनवरून बातचीत केली. उपराष्ट्रपती अन्सारींना या पदासाठी सलग दुसर्‍यांदा उमेदवारी देण्यात आली.

close