साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बागवे मैदानात

July 14, 2012 3:05 PM0 commentsViews: 12

14 जुलै

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला यावेळी वादाची किनार लाभली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक बागवे यांनी उडी घेतली आहे. तर दुसरीकडे त्यांना विरोधही सुरू झालाय. अशोक बागवे हे सरंजामी मनोवृत्तीचे असून कोकण मराठी साहित्य परिषद फोडण्यासाठीच ते उभे राहिल्याचा आरोप कवी महेश केळुस्कर यांनी केलाय. तसेच त्यांना मतदार निवडून देणार नाहीत असा दावाही त्यांनी केला. अशोक बागवे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून कोपसापच्या बैठकीत बागवे यांचा निषेध करण्यात आला.

close