उध्दव ठाकरेंना बायपास सर्जरीचा डॉक्टरांचा सल्ला

July 17, 2012 9:52 AM0 commentsViews: 3

17 जुलै

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची बायपास सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काल रात्री लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या एका पथकानं मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची तपासणी केली यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. उद्धव ठाकरेंच्या हृदयात तीन ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिलाय. पण उद्धव ठाकरे शस्त्रक्रियेच्या इतर पर्यायांबद्दल माहिती घेतायत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काल सोमवारी उध्दव ठाकरे यांच्यावर यशस्वी अँजिओग्राफीची करण्यात आली होती. यानंतर उध्दव याना संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला.

close