डिसेंबरमध्ये भारत-पाक मुकाबला

July 16, 2012 8:53 AM0 commentsViews: 4

16 जुलै

तब्बल पाच वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संबंध जुळणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान सीरिज खेळवण्यात खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या सीरिजसाठी पाकिस्तानची टीम भारतात येणार आहे. या दोन्ही देशांदरम्यान 3 वन डे मॅच होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये 2007 ला शेवटची क्रिकेट सीरिज खेळवण्यात आली होती. त्यानंतर वर्ल्डकप सेमिफायनमध्ये भारत-पाक दरम्यान सामना झाला होता. आता पाच वर्षांनंतर या दोन्ही टीम आमने सामने येण्याची शक्यता आहे.

close