मालवाहतूकदारांचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप

July 17, 2012 10:29 AM0 commentsViews:

17 जुलै

राज्यातील सर्व खाजगी वाहने आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. एकूण 270 संघटना या संपात सहभागी होणार आहेत. यात स्कूल बसचा समावेश आहे. वेळ पडल्यास भाजीपाला आणि दूध टँकरही सहभागी होतील. राज्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असून याला मोठी वाहने जबाबदार असल्याचं कारण समोर करीत या वाहनांना स्पीड गर्वनर बसविण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

ट्रक, कंटेनर, टेम्पो किंवा बस प्रत्येकाला विवीध स्पीड मीटरचा वेग निश्चत करण्यात आलाय. या वाहनांना वेग नियंत्रक बसविल्यावर महामार्गावरही वाहनाचा कमाल वेग हा 50 ते 60 किमी राहील. मात्र राज्यातील वाहतूकदारांनी याचा तीव्र विरोध केला आहे. आमच्या वाहनावर वेग नियंत्रक बसवून सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे. या नियमामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यास वेळ लागणार असल्यानं वेळ आणि प्रकर्षानं इंधन खर्च होत असल्याने हा नियम त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून करण्यात आली आहे. दरम्यान, सरकार फक्त कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतंय. यात सरकार काहीच करू शकत नाही. त्यामुळे वाहतूकदरांनी हा संप मागे घ्यावं असं आवाहन परिवहन मंत्री गुलाबराव देवकर यांनी केलंय.

close