खाण घोटाळा उघड केला म्हणून तलाठी निलंबित

July 16, 2012 9:23 AM0 commentsViews: 14

16 जुलै

वरीष्ठांचा भ्रष्टाचार उघड करुन खाण घोटाळा बाहेर काढणार्‍या एका तलाठ्याला निलंबित करण्यात आलंय. विनोद खोब्रागडे असं या तलाठ्याचं नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज गावाजवळ असलेल्या कर्नाटक एम्टा कंपनीने कोळसा खाणीच्या बाजूला बेकायदेशीपणे उत्खनन करुन 100 कोटींचा महसूल बुडवल्याचं खोब्रागडे यांनी उघड केलं होतं. याबाबतची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवल्यानंतर खोब्रागडे यांनी वरीष्ठांची परवानगी न घेता प्रसारमाध्यमांशी बोलल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलंय. पण त्यांना नोटीसही न बजावता खोब्रागडेंवर थेट कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचाराची चौकशी करण्यापेक्षा तो उघड करणार्‍या कर्मचार्‍यावरच कारवाई करण्याच्या या प्रकारानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

close