अखेर प्रणवदांना ममतांचा पाठिंबा

July 17, 2012 11:53 AM0 commentsViews: 4

17 जुलै

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन तृणमुलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पुकारलेला विरोध आता मावळला आहे. प्रणवदांना कडाडून विरोध करणार्‍या ममतादीदी आता प्रणवदांना मतदान करणार असल्याचं जाहीर केलं आहे. प्रणवदांना मतदान करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. आपले मत वाया जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. मतदान करण्याचा आमचा निर्णय क्लेशदायक आहे अशी खंत बाळगत ममतादीदींना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना स्वत: ममतादीदींनी आपली मर्जी कळवली आहे. पण उपराष्ट्रपतीपदासाठी ममतांनी निर्णय राखून ठेवला आहे. ममतांच्या पाठिंब्यामुळे आता प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ममतांच्या पाठिंब्यामुळे प्रणव मुखजीर्ंचा विजय निश्चित मानला जातोय. एक नजर टाकूया आकडेवारीवर

प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा – 66.7 %यूपीए + राजद + सपा + बसपा + जेडीएस + सीपीएम + फॉरवर्ड ब्लॉक + शिवसेना + जेडीयू

संगमांना पाठिंबा – 30.3%भाजप + अकाली दल + जेएमएम + बीजेडी + अण्णाद्रमुक

अनिर्णित पक्ष – 3%तेलुगू देसम + इतर

close