‘तलाठी खोब्रागडेंचं निलंबन मागे घ्या अन्यथा सामुदायिक रजेवर जाऊ’

July 17, 2012 12:16 PM0 commentsViews: 12

17 जुलै

तलाठी खोब्रागडे यांचं तात्काळ निलंबन मागे घ्यावे अन्यथा मंगळवारपासून सामुदायिक रजेवर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी समन्वय महासंघाने दिला आहे. सोमवारपर्यंत सरकारनी निर्णय घ्यावा असं अल्टिमेटमही त्यांनी दिलंय. त्याचबरोबर ज्या प्रांत अधिकार्‍यांनी त्यांचं निलंबन केलं त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे यांनी केली आहे. तलाठी विनोद खोब्रागडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज गावाजवळ असलेल्या कर्नाटक एम्टा कंपनीने कोळसा खाणीच्या बाजूला बेकायदेशीपणे उत्खनन करुन 100 कोटींचा महसूल बुडवल्याचं खोब्रागडे यांनी उघड केलं होतं. याबाबतची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवल्यानंतर खोब्रागडे यांनी वरीष्ठांची परवानगी न घेता प्रसारमाध्यमांशी बोलल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलंय.

close