जुलै महिन्यातसुध्दा पावसाची हुलकावणी

July 16, 2012 7:55 AM0 commentsViews: 5

16 जुलै

पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी यंदा पावसानं दडी मारल्यानं चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जुलै महिन्यातला अंदाज खरा ठरण्याची शक्यता कमी असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. ऑगस्टमध्ये एलनिनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनला आणखी फटका बसू शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलंय. पाऊस कमी झाल्याने कृषिउत्पादनात घट होण्याची भीती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसाची स्थिती चिंताजनक आहे असंही ते म्हणाले. पण धान्याचा आवश्यक साठा असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं.

close