भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ आपटे यांचं निधन

July 17, 2012 12:20 PM0 commentsViews: 6

17 जुलै

भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ आपटे यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पक्षाचा एक कुशल संघटक हरपलाय. बाळ आपटे सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकिल होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक पदं भूषवली. ते अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते. प्रा. बाळ आपटे यांच्यावर उद्या सकाळी दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असू भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, अरूण जेटली राहणार उपस्थित राहणार आहे.

close