यवतमाळमध्ये आश्रमशाळेत विद्यार्थ्याला सर्पदंश

July 16, 2012 8:01 AM0 commentsViews: 5

16 जुलै

आश्रमशाळेत सर्पदंशान दोन विद्यार्थ्याच्या मृत्यू झाल्याच्या घटनेला चार दिवस झाले नाही तर यवतमाळ जिल्हात एका विद्यार्थ्याला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्हातील जरुर गावातील आबासाहेब देशमुख पारवेकर आदिवासी आश्रमशाळेतील हा विद्यार्थी आहे. यवतमाळ शासकीय रुग्णालयात हा विद्यार्थी मृत्यूशी झुंज देतोय. संदीप सुधाकर कोरडे असं या 16 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. 11 जुलैला त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण या घटनेबाबत आश्रमशाळेने कमालीची गुप्तता बाळगली आहे. कुणीही याबद्दल बोलायला तयार नाही.

close