आपल्याविरोधात निघालेल्या मोर्च्यात उदयनराजेंची एंट्री

July 17, 2012 12:26 PM0 commentsViews: 8

17 जुलै

खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातार्‍यात आमदार विवेक पंडित यांनी मोर्चा काढला होता. या मोर्च्यात मोठ्याप्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. उदयनराजे भोसले यांनी कुळांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येत होता. मोर्चा रस्त्यात असतांना या मोर्चात अचानक उदयनराजे आणि त्यांचे समर्थक घुसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर उदयनराजे यांनी या शेतकर्‍यांसमोर स्वत:च भाषण केलं. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विवेक पंडित यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर पंडित यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिलं.

close