‘ लवासाचं पाणी दौंडला द्या !’

July 17, 2012 2:50 PM0 commentsViews:

17 जुलै

दौंडमध्ये 3 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने पुण्याच्या खडकवासल्यामधून अर्धा टीएमसी पाणी दौंडला द्यावे या पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावाला मनसे पाठोपाठ सुरेश कलमाडींनीही विरोध केला आहे. दौंडला पाणी द्यायचा निर्णय पुढं ढकलण्यात आलाय. या संदर्भातली बैठकही रद्द करण्यात आली. दुसरीकडे लवासामधे अर्धा ते पाऊण टीएमसी पाणी साठा असून पर्यटक तिथं मॉन्सून मस्ती करतयात. ज्ेाव्हा पुण्याला पाणीटंचाई भासेल तेव्हा लवासातून पाणी द्यायचं असा करारही आहे. मग लवासातून दौंडला अर्धा टीएमसी पाणी द्या अशी मागणी आता पुढं आली आहे. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि विवेक वेलणकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून लवासाचं पाणी दौंडला द्यावं अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी लवासाने करमणूक कर न भरता वॉटर स्पोर्टस सुरू केल्याबद्दल लवासाला दंड ठोठावण्यात आला होता.

close