अण्णा- बाबा रामदेवांचे 9 ऑगस्टला आंदोलन

July 17, 2012 5:40 PM0 commentsViews: 4

17 जुलै

भ्रष्टाचार आणि काळा पैसा या मुद्यांवर अण्णा हजारे आणि बाबा रामदेव पुन्हा एकदा एकत्र आले आहे. 9 ऑगस्टपासून दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली आहे. या आंदोलनात अण्णा हजारे स्वत: उपस्थित राहणार आहेत.आज अण्णा आणि बाबांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यामुळे लोकपाल कायदा आल्या तर हे मंत्रीच जेलमध्ये जातील अशी भीती सरकारला वाटत असल्याने सक्षम लोकपाल विधेयक आणायला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप बाबा रामदेव यांनी केला. तर आता सरकारवर विश्वास उरला नाही, असं अण्णा हजारेंनी सांगितलं.

close