राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मनसे राहणार तटस्थ

July 19, 2012 9:41 AM0 commentsViews: 1

19 जुलै

राज्याच्या विधिमंडळातही राष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू आहे. पण या निवडणूक मनसे तटस्थ राहणार असल्याची घोषणा मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मनसेनं काँग्रेसला मतदान करावं अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पण त्यांची ही मागणी मान्य न करता तटस्थ राहण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे. मनसेला दिल्लीतून कुणी बोलले असते तर वेगळा निर्णय झाला असता पण तसं झालं नाही त्यामुळे मनसे तटस्थ राहणार आहे.

close