मृणालताई कर्तृत्ववान विरोधक – शरद पवार

July 17, 2012 5:55 PM0 commentsViews: 13

17 जुलै

महाराष्ट्रासाठी 50 वर्षांपेक्षा अधिक मृणालताईंनी निश्कलंक लढा दिला. मृणालताई आणि केशव गोरे यांनी समाजासाठी आयुष्य वाहून दिले. त्यांची कारकीर्द खूप मोठी होती. केशव गोरे यांच्या निधनामुळे त्यांचावर मोठा आघात झाला पण तरी सुध्दा पतीच्या निधनानंतरही मृणालताईंनी समाजासाठी आपले आयुष्य वाहुन दिले. विरोधपक्षात असताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द करुन दाखवले. मी मुख्यमंत्री असताना त्यांच्या अनेक आंदोलनाशी आम्ही आमनेसामने आलो. त्यांनी लाटणं मोर्चा काढून अख्खे मंत्रालय दणाणून सोडले होते अशा आठवणी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केल्या.

close