पुरोहितला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

November 26, 2008 2:47 PM0 commentsViews:

26 नोव्हेंबर मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. शिरीष दाते यांनी पुरोहितविरोधात बनावट शस्त्र परवान्यासंदर्भात फिर्याद केली होती. प्रसादनं बनावट शस्त्रपरवाना देऊन फसवणूक केल्याची तक्रार दाते यांनी केली होती. एटीएस आपला छळ करत असल्याची पुरोहितनं आजही कोर्टात तक्रार केली. त्यावर तुमच्या अंगावर साधा ओरखडाही उठला नसल्याचा रोजचा मेडीकल रिपोर्ट आहे. त्यामुळे अकारण कांगावा करून नका असं सरकारी वकिलांनी त्याला कोर्टात सुनावलं.मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुरोहित सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आता बनावट शस्त्र परवाना प्रकरणी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली गेली. प्रसाद पुरोहितने 5 ऑक्टोबरला शिरीष दातेकडून 20 हजार रुपये घेतल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. आर्मीच्या शस्त्र परवान्यातील कोट्यातून खोटे लायसन्स पुरोहितने तयार केले. पुरोहितनेच दाते यांना रिव्हॉल्व्हर चालवण्याचे प्रशिक्षणही दिल होते.

close