भुजबळ आणि अशोका बिल्डकॉन चे साटेलोटे – सोमय्या

July 19, 2012 11:27 AM0 commentsViews: 5

19 जुलै

महाराष्ट्र सदनातील कंत्राटांवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अडचणीत सापडले असतानाच आता बेनामी कंपन्या काढून गैरव्यवहार केल्याचाही आरोप होतोय. आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भुजबळ यांच्यावर आरोप केले. भुजबळ आणि अशोका बिल्डकॉन चे साटेलोटे आहे. अशोका बिल्डकॉन ला बीओटी (BOT) ची कंत्राटे द्यायची आणि भुजबळ फाऊंडेशनला या कंपनीकडून घ्यायच्या असे प्रकार होत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्याचबरोबर अशोका बिल्डकॉनसोबतचे आर्थिक हितसंबंध भुजबळांनी स्पष्ट करावे अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे.

close