मावा- खर्रावरही येणार बंदी

July 18, 2012 8:57 AM0 commentsViews: 6

18 जुलै

आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटख्यावर बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. पण या पाकिटबंद गुटख्याबरोबरच हातानं बनवण्यात येणारा मावा किंवा खर्रा यावरही बंदी येणार आहे. अँटी केकिंग एजंट म्हणून काही पदार्थांमध्ये 2 टक्क्यांपर्यंत मॅग्नेशिअम कार्बोनेटचं प्रमाण असू शकतं पण गुटख्यामध्ये 9 टक्क्यांपर्यंत मॅग्नेशिअम कार्बोनेट असतं. पानटपरीवर विकल्या जाणार्‍या खर्रा किंवा माव्यासारख्या पानमसाल्यामध्ये 9 टक्क्यांपेक्षा जास्त मॅग्नेशिअम कार्बोनेटचं प्रमाण आढळलं आहे. त्यामुळे गुटख्यासह पानटपरीवर बनवल्या जाणार्‍या पानमसाल्यावरही सरकारनं बंदी घातली आहे. यासंबंधीचं नोटीफिकेशन लवकरच जारी केलं जाणार आहे अशी माहिती माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलीय.

close