खासगी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ?

July 18, 2012 10:50 AM0 commentsViews: 2

18 जुलै

राज्यातल्या पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे सर्व सरकारी धरणातील पाणी पिण्यासाठीच वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतला आहे. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यास खासगी धरणातील पाणीही पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा विचार राज्य सरकारने विधानसभेत व्यक्त केला आहे. कोयना धरणातील वीजनिर्मिती आधीच बंद करण्यात आलीये. आता उजनीतल्या लाभक्षेत्रातील टाटाच्या चार धरणातील पाणीही पिण्यासाठीच राखीव ठेवण्यावर राज्य सरकार विचार करु शकतं अशी माहिती ऊर्जामंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. असं झालं तर राज्यावर पाण्या पाठोपाठ लोडशेडिंगचं संकट येऊ शकतं. तर दुसरीकडे राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून राज्य सरकारने आपात्कालीन योजना तयार केली आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी लवकरच गटनेत्यांची बैठक बोलावली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय.

close