अभ्यासक्रमात प्रणवदांना राष्ट्रपती म्हणून केलं घोषित

July 19, 2012 12:59 PM0 commentsViews: 3

19 जुलै

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं असून फैसला अजून बाकी आहे मात्र गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाला जरा नव्या राष्ट्रपतीची जरा जास्तच घाई झाली, विद्यापीठाने बी ए प्रथम वर्षाच्या क्रमिक पुस्तकात प्रणव मुखर्जी यांचे 14 वे राष्ट्रपती म्हणून दाखवण्यात आलंय. विद्यापीठ अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ संजय गोरे यांनी हे पुस्तक लिहीलं आहे. या पुस्तकातील पान क्रमांक 84 वर राष्ट्रपतींची यादी दिलीय. यामध्ये चक्क प्रणव मुखर्जी यांचा समावेश केलाय. सदर पुस्तक म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे, या लेखकावर कारवाईची मागणी माजी आमदार अशोक नेते यांनी केली आहे.

close