दौंडसाठी ‘खडकवासला’च्या पाण्याला युतीचा विरोध

July 18, 2012 7:55 AM0 commentsViews: 2

18 जुलै

अखेर दौंडसाठी खडकवासला धरणातील अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागानं हा निर्णय घेतलाय. पण आता या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. या निर्णयाला पुण्यातील भाजप आणि शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी विरोध केला आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर उपोषण करण्याचा इशारा युतीच्या आमदारांनी दिला आहे.

close