डॉ.दमाणींवर कारवाई विरोधात हॉस्पिटल बंदचा इशारा

July 19, 2012 8:11 AM0 commentsViews: 1

19 जुलै

जळगांव जिल्ह्यात पुन्हा एकदा मृत अर्भक सापडण्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील बी जे मार्केटमधील डॉ.दमाणी हॉस्पिटलजवळील ड्रेनेजमधे हे अर्भक सापडलं. या प्रकरणी पोलीसांनी आई वडीलांसह डॉक्टरांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेत डॉ.मनीषा दमाणींसह पालकांची पोलिसांनी वैयक्तीक जामीनावर मुक्तता केली आहे. डॉ.दमाणींविरुध्द केलेल्या कारवाईचा आयएमएमनं निषेध केला आहे. शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल बंद करण्याचा आयएमएमनं निर्णय घेतला आहे.

शहरातील बी जे मार्केटमधील डॉ.दमाणी हॉस्पिटलजवळील ड्रेनेजमधे हे अर्भक सापडलं. पोलिसांना डॉ.दमाणी यांनीच ही माहिती दिली. पण तपासात या हॉस्पिटलमध्ये दाखल ज्योती कैलास सोनवणे या महिलेचंच गर्भपात झाल्याचं निष्पन्न झालं. या मृत अर्भकाची विल्हेवाट चुकीच्या पध्दतीनं केल्याचं महापालिकेच्या आरोग्य अधिकारी निर्मला शर्मा यांच्या पथकाच्या पाहणीत निष्पन्न झालं. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिल्यानं पोलिसांनी अर्भकाच्या आई वडिलांसह डॉ. मनीषा दमाणी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करुन वैयक्तीक जामीनावर मुक्त केलं आहे. हा गर्भपात नैसर्गीक असल्याचा दावा रुग्णाच्या आई वडिलांसह डॉक्टरांनी केलेला दावा केला आहे. दरम्यान, डॉ.दमाणी यांनी हा गर्भपात स्त्री भ्रूण हत्येसाठी केला नसून त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा इंडीयन मेडीकल असोसिएशननं निषेध केला आहे.शहरातील प्रख्यात स्त्री रोग तज्ञ म्हणून ओळख असलेल्या डॉ.मनीषा दमाणी यांना अटक झाल्याने इंडीयन मेडीकल असोसिएशननं शनीवारपासुन बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

close