ठोबळेंच्या पाठीशी सरकार – गृहमंत्री

July 18, 2012 3:09 PM0 commentsViews: 2

18 जुलै

विधानसभेत एसीपी वसंत ढोंबळेंच्या कारवाईसंदर्भात चर्चा झाली. शिवसेना आमदारांनी वसंत ढोबळेंच्यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. कारवाईच्या वेळेस माध्यमं कशी हजर असतात ? असा सवाल शिवसेना आमदारांनी सरकारला विचारला. त्याला उत्तर देताना पोलिसांनी छापा टाकलेल्या बातम्यांसदर्भात नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितलं. पण छापे टाकणार्‍या अधिका-यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहिलं असंही आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं. वसंत ठोबळे यांनी मागिल दोन महिन्यापासून पब,डिस्को,बार यांच्याविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे पबचालकांचे धाबे दणाणले असून दुसरीकडे आमच्या नाईट लाईफवर हा घाला असल्याचा सुर उच्चवर्गीयांनी लगावला आहे. या कारवाईच्या विरोधात उच्चवर्गीय रस्त्यावर उतरले. पण ठोबळेंच्या कारवाई योग्य असल्याचं सांगत मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनायक खंबीरपणे ठोबळेंच्या पाठीशी उभे राहिले. खुद्द गृहमंत्र्यांनीही ठोबळेंची पाठ थोपाटत पाठीशी असल्याचं विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.

close