महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींचा नकार

July 19, 2012 2:03 PM0 commentsViews: 2

19 जुलै

दिल्लीतल्या नव्या महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील करणार नाहीत. या सदनाच्या बांधकामांची कंत्राटं वादात सापडले असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय. बांधकामाची कंत्राटं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप भाजपने केलाय. राष्ट्रपतींनी उद्घाटन करू नये, अशी भाजपनं केली होती मागणी केली होती. महाराष्ट्र सदनाच्या नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आहे.

close