काळवीट शिकार, मनोहर नाईकांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल

July 18, 2012 3:17 PM0 commentsViews: 7

18 जुलै

वाशिमजवळच्या काजळआंबा शिवारातल्या काळवीट शिकार प्रकरणी अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांचे पुतणे अनिल मधुकर नाईक यांच्यासह आठ जणांवर वनाधिकार्‍यांनी गुन्हा दाखल केला आहे. काजळआंबा शिवारात एक काळवीट मृतावस्थेत आढऴून आलंय. काळविटाची शिकार झाली की अपघाती मृत्यू झाला हे पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट होईल. मध्यरात्री 12 वाजता अचानक या ठिकाणी गाडी थांबल्यामुळे शेतकर्‍यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना खबर दिली. वनविभागाने घटनास्थळी काळविटाचा पंचनामा केला आणि नैसर्गिक मृत्यूची नोंद केलीय.

close