टी-20 वर्ल्डकपमध्ये युवीचे कमबॅक ?

July 18, 2012 3:31 PM0 commentsViews: 113

18 जुलै

कँन्सर सारख्या आजाराशी चार हात करुन आलेल्या युवराज सिंग मैदानावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहे. आता मात्र जास्त वेळ वाट पाहण्याची गरज नाही कारण सप्टेंबर महिन्यात होणार्‍या 20-20 वर्ल्डकपसाठी 30 जणांच्या संभाव्य टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये सुपरस्टार फलदांज युवराज सिंगचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे युवराज सिंगचा कमबॅक असेल. गेल्यावर्षी विंडीज दौर्‍यातून अनफिटमुळे बाहेर पडलेल्या युवीला रुटीन तपासअंतर्गत कँन्सर असल्याचे समोर आले होते. यानंतर उपचार घेण्यासाठी युवी अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. उपचारातून सावरल्यानंतर युवी मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे.

close