होय, सलमान खुर्शीदांसोबत गुप्त बैठक झाली – अण्णा

July 18, 2012 4:00 PM0 commentsViews:

18 जुलै

केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याशी भेट झाल्याचं अण्णा हजारे यांनी मान्य केलंय. या गुप्त भेटीबद्दल आयबीएन-लोकमतनं काल मंगळवारी बातमी दिली होती. त्यानंतर अण्णांनी आज राळेगणसिद्धीत पत्रकार परिषद घेतली. आणि 23 जून रोजी सलमान खुर्शीद यांच्याशी भेट झाल्याचं सांगितलं. या भेटीत लोकपालच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं ते म्हणाले. देशाच्या भल्यासाठी भेटीबद्दल गुप्तता पाळली होती. खुर्शीद यांनीच ही बैठक गोपनीय ठेवण्याची विनंती केली होती, असं अण्णांनी सांगितलं. पण, आता या भेटीबद्दल आपल्याच सहकार्‍यांना सांगून सरकार टीम अण्णांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप अण्णांनी केला आहे.

close