राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

July 18, 2012 5:14 PM0 commentsViews: 14

18 जुलै

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. यूपीएकडून प्रणव मुखर्जी आणि एनडीएकडून पी. ए. संगमा रिंगणात आहेत. प्रणव मुखर्जी यांचा विजय निश्चित मानला जातोय. सकाळपासूनचं मतदानाला सुरुवात झाली. राज्यात मुख्यमंत्री, उमपमुख्यमंत्री यांच्यासह आमदारांनी मतदान केलं. तर दिल्लीत पंतप्रधनांसह काँग्रेस- आणि भाजपच्या ज्येष्ठ नेते मतदान करत आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होत नसते. राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीसुद्धा गुप्त मतदान होतं. राज्यसभेचे सरचिटणीस हे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतात. निवडून दिलेले सर्व खासदार आणि आमदार मतदान करतात.

राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया

- लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व लोकनियुक्त खासदार, विधानसभेचे सर्व आमदार मतदान करतात- महाराष्ट्रातले एकूण आमदार – 288- एका आमदाराच्या मताचं मूल्य – 175- आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य – 288×175 = 50,400- देशभरातले एकूण आमदार – 4120- आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य – 5,49,474- एकूण खासदार – 776 (लोकसभा 543 + राज्यसभा 233)- खासदाराच्या एका मताचं मूल्य – 5,49,474 / 776 = 708- खासदारांच्या मतांचं एकूण मूल्य – 708 x 776 = 5,49,408

सर्व मतांचं एकूण मूल्य आमदारांची मतं + खासदारांची एकूण मतं (5,49,474) + (5,49,408) = 10,98,882विजयासाठी आवश्यक मतं = 5,49,442

काँग्रेसजवळची राज्यातली मतं (आमदार)- काँग्रेसकडे 228 आमदारांची मतं- काँग्रेस + सहयोगी आमदार – 82 +16 = 98- राष्ट्रवादी काँग्रेस + सहयोगी आमदार – 62 + 12 = 74- शिवसेना + सहयोगी आमदार – 45+1 = 46- समाजवादी पक्ष = 03- शेकाप = 04- जनसुराज्य शक्ती = 02- सीपीएम = 01

काँग्रेसकडे राज्यातले खासदार (लोकसभा)- काँग्रेसकडे लोकसभेतल्या खासदारांची मतं 39- काँग्रेस खासदार = 17- राष्ट्रवादी खासदार = 09- शिवसेना = 11- अपक्ष (सदाशिव मंडलिक) = 01- बहुजन विकास आघाडी = 01- काँग्रेसकडे राज्यातल्या राज्यसभेच्या खासदारांची मतं 13- काँग्रेस = 06- राष्ट्रवादी काँग्रेस = 04- शिवसेना = 03

काँग्रेसकडे मनसेची मतं ?- काँग्रेसकडे मनसेची 12 मतं येण्याची शक्यता- मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात बोलणी सुरु- मनसेची भूमिका संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार

भाजपकडे राज्यातली मतं (आमदार)- भाजप = 47- अपक्ष ( अनिल गोटे ) – 01भाजपकडे राज्यातले खासदार – भाजपकडे लोकसभेच्या नऊ खासदारांची मतं- भाजप = 08- स्वाभिमानी शेतकरी संघटना (राजू शेट्टी) – 01- राज्यसभेच्या भाजप खासदारांची मतं – 06

- एका आमदाराच्या मताची किंमत- 175- एका खासदाराच्या मताची किंमत – 708- काँग्रेसच्या आमदारांच्या मतांची किंमत – 228 X 175 = 39,900- काँग्रेसच्या खासदारांच्या मतांची किंमत – 52 X 708 = 36, 816- काँग्रेसच्या एकूण मतांची किंमत = 76, 716

close