जुहू रेव्ह पार्टी प्रकरणी क्रिकेटर राहुल-वेन पर्नेल दोषी

July 20, 2012 5:25 PM0 commentsViews: 7

20 जुलै

मंुबईत जुहू येथे झालेल्या रेव्ह पार्टीतल्या 44 पैकी 42 जण ड्रग्ज टेस्टमध्ये दोषी आढळले आहे. यामध्ये क्रिकेटर राहुल शर्मा आणि वेन पर्नेल सुध्दा दोषी आढळले आहे. 21 मे रोजी जुहू इथल्या ओकवूड हॉटेलमधल्या रेव्ह पार्टीप्रकरणी पोलिसांनी छापा टाकला होता यावेळी 100 जणांना ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणी क्रिकेटर राहुल शर्माने मी ड्रग्ज घेतले नाही जर मी दोषी आढळलो तर क्रिकेट सोडून देईल असा दावा केला होता. सध्या राहुल शर्मा हा श्रीलंका दौर्‍यावर गेला आहे. उद्या भारत-लंकाची पहिली वन डे मॅच होणार आहे. पोलिसांनी दोषींवर कडक कारवाईचे पाऊल उचलले आहे. मात्र राहुलने केलेल्या दाव्यामुळे बीसीसीआयने श्रीलंका दौर्‍यासाठी त्याची निवड केली. पण आता दोषी आढळल्यामुळे बीसीसीआय काय कारवाई करत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close