आजपासून राज्यात वर्षभरासाठी गुटखाबंदी लागू

July 20, 2012 9:48 AM0 commentsViews: 9

20 जुलै

राज्यात आजपासून गुटखाबंदी लागू झाली आहे. गुटखा आणि पानमसाल्यावर आजपासून वर्षभरासाठी बंदी लागू करण्यात आली आहे. गुटख्याचा काळाबाजार होऊ शकतो या शक्यतेनं सरकारनं राज्याच्या सीमेवर 9 ठिकाणी आरटीओंना तपासणीचे अधिकार देण्यात आले आहे. गुटख्याची विक्री करणार्‍यांना 1 ते 6 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. काल गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुटखाबंदीवर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. आज याबद्दल अधिसुचना जारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर खर्रा आणि माव्यावरही बंदी असणार आहे.

close