अमेरिकेत चित्रपटगृहात बेछूट गोळीबार, 12 ठार

July 20, 2012 5:56 PM0 commentsViews: 3

20 जुलै

अमेरिकेतील डेनव्हरमधल्या चित्रपटगृहात एका बुरखाधारी व्यक्तीनं बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 12 जण ठार तर 50 जण जखमी झाले आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. 'द डार्क नाईट रोजेस-बॅटमन' या चित्रपटाचा प्रिमियर शो सुरू होता. त्यावेळी हल्लेखोर आत घुसला आणि त्यानं बेछूट गोळीबार केला. या हल्लेखोराचे सीसीटीव्ही फूटेज जारी करण्यात आले आहे.

close