नव्या महाराष्ट्र सदनाच्या इमारतीचं उद्घाटन रद्द

July 20, 2012 10:28 AM0 commentsViews: 1

20 जुलै

दिल्लीतलं नवं महाराष्ट्र सदन वादात सापडलं आहे. 21 जुलैला होणारं महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन रद्द करण्यात आलंय. सदनाचं काम अजून अपूर्ण असल्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्घाटनाला हिरवा कंदील दाखवण्यास नकार दिला आहे. यापूर्वी कालच महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन करायला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नकार दिला. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामांची कंत्राट देण्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केला होता. बांधकामाची कंत्राटं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी उद्घाटन करू नये, अशी मागणी भाजपने केली होती. राष्ट्रपतींनी उद्घाटन न करण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे राज्य सरकारवर मात्र नामुष्की ओढावली आहे.

close