चकमकीत 14 पोलीस शहीद

November 26, 2008 8:44 PM0 commentsViews: 6

27 नोव्हेंबर, मुंबईमुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पोलीस दलाचे एकूण 25 अधिकारी जखमी झाले आहेत. 5 वरिष्ठ पोलीस अधिकारी , 6 कॉन्स्टेबल आणि अन्य 3 पोलीस या अतिरेकी कारवाईत शहीद झाले आहेत. यामध्ये एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळस्कर आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे कामा हॉस्पिटलजवळ हे अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले तर पोलीस इन्स्पेक्टर शशांक शिंदे हे छ.शिवाजी टर्मिनसला कारवाईत मृत्यूमुखी पडले. उप पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणिअतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते हे या कारवाईत जखमी झाले आहेत. अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकार्‍यांची नावं-1) एटीएस पथकाचे सहआयुक्त हेमंत करकरे 2) उत्तर पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे3) क्राईम ब्राँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर 4)रेल्वेचे पोलीस निरीक्षक शशांक शिंदे5) एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक प्रकाश मोरे 6) एटीएस पोलीस उपनिरीक्षक बाबूराव बुरूगडे 7) क्राईम ब्राँचचे पोलीस शिपाई अरुण चित्ते8) पोलीस शिपाई विजय खांडेकर 9) मोटार परिवहन मेट्रोचे पोलीस शिपाई नानासाहेब भोसले10) पोलीस शिपाई उमळे 11) पोलीस शिपाई जयंत पाटील 12) पोलीस शिपाई योगेश पाटील13) पोलीस शिपाई अंबादास पवार, 14) पोलीस शिपाई एम सी चौधरी

close