दुसरीही मुलगी झाली म्हणून बापाने घोटला तान्हुलीचा गळा

July 21, 2012 9:57 AM0 commentsViews: 7

21 जुलै

दुसरीही मुलगी झाल्यामुळे एका बापानेच 20 दिवसाच्या तान्हुलीचा गळा घोटण्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. बीड शहरातील सय्यदनगर भागामध्ये राहणार्‍या मोमीन इलियास अन्सारी याने हे धक्कादायक कृत केलं. या अगोदर एक मुलगी होती आणि दुसरीही मुलगी झाल्यानं त्याने हे कृत्य केलंय. घरामध्ये असलेल्या पाण्याचे ड्रममध्ये या तान्हुलीला बुडवून मारल्यान एकचा खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बापाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. घरामध्ये कुणीही नसल्याचं पाहून त्यानी आपल्या कोवळया मुलीला ड्रममध्ये टाकून पळून गेला होता. मागिल महिन्यात बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्या प्रकरणं उघड झाल्यामुळे एकच हाहाकार उडाला होता. ही प्रकरण थांबत नाही तोच एका बापाचा निर्दयीपणा समोर आला आहे.

close