पश्चिम रेल्वेचे 180 मोटरमन रजेवर

July 20, 2012 10:49 AM0 commentsViews: 9

20 जुलै

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. 180 मोटरमनने अचानक सामुहिक रजेवर गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दादर,चर्चगेटवर लोकल जागेवर थांबल्या आहे. स्टेशनवर प्रवाशांच्या खोळंबा झाला आहे. मोटरमन इन्स्ट्रक्टरच्या पाच जागा रिकाम्या होत्या. त्या जागा मोटरमनचं प्रमोशन करून भरणं आवश्यक होतं. पण अधिका-यांच्या मर्जीनं मोटरमनना डावलून इतरांना संधी दिली. त्यामुळे संतप्त मोटरमननी आज रजा आंदोलन पुकारलं आहे. नेमकं चाकरमान्याची कार्यालय सुटल्यामुळे प्रवाशांच्या आतोनात हाल होत आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी घेण्यात आलेली बैठक निष्फळ ठरली असून मोटारमन संघटना आक्रमक झालीय.

close