कोल्हापूरच्या महिलांनी पालिकेला टाळं ठोकलं

November 26, 2008 1:16 PM0 commentsViews: 8

26 नोव्हेंबर कोल्हापूरपाणी टंचाईला कंटाळलेल्या महिलांनी कोल्हापूर महानगरपालिकेला आणि पाणी पुरवठा विभागांना टाळं ठोकलं. गेले काही दिवस शहरातल्या काही भागात आणि उपनगरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र महापालिकेनं त्यावर काहीही उपाय योजना केली नाही. त्यामुळे चिडलेल्या महिलांनी महापालिकेच्या तीन पाणीपुरवठा विभागांवर मोर्चा काढला. तिथल्या कर्मचा-यांना धारेवर धरलं. आणि ऑफिसला टाळं ठोकलं.मोर्चात येताना महिलांनीं प्रशासनाला बांगड्या आणि मिरच्या हातात आणल्या होत्या.त्यांनी महापालिकेवर हल्लाबोल करत महापालिकेच्या मुख्य गेटला टाळं ठोकलं.आणि निदर्शन सुरू केली.एक तासाहून अधिक काळ महापालिकेच्या गेटला टाळं होतं.तरीही एकही प्रशासन अधिकारी या महिलाचं निवेदन स्वीकारायला आले नाहीत.त्यामुळे संतप्त झालेल्या महिला महापालिकेत धुसण्याचा प्रयत्न केला.पण पोलिसांनी बळाचा वापर करत मोर्चेकरी महिलांना आणि एका नगरसेवकाला ताब्यात घेतलं.तरीही कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त गणेश देशमुख यांनी आपल्याला आंदोलक आल्याचं माहित नसल्याचं सांगितलं.

close