वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचे मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

July 21, 2012 7:31 AM0 commentsViews: 19

21 जुलै

सातारा जिल्ह्यातल्या वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तीव्र झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी आंदोलन सुरू केलंय. धरणग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या निषेधासाठी शेतकर्‍यांनी धरणावरच आंदोलन सुरु केलंय. धरणाचे दरवाजे खुले करायला आंदोलकांनी भाग पाडलंय. एकूण 1872 धरणग्रस्तांपैकी एक हजार धरणग्रस्तांचं पुनर्वसन झालंय. उरलेल्या धरणग्रस्तांना लाभक्षेत्रामध्ये जमीन मिळत नाहीय, त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.

close