रोहयोमध्ये प्राध्यापक,व्यापारी करताय मजुरी

July 21, 2012 10:53 AM0 commentsViews: 3

21 जुलै

कापड दुकानदार, प्राध्यापक आणि व्यापारी यांची नावं रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या यादीत घालण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघडकीला आला आहे. जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोटूळ गावातला हा प्रताप आहे. या यादीत मजूर म्हणून बाळासाहेब पोवळे, कापड दुकानदार प्रदीप आरोटे, प्राध्यापक रविंद्र आरोटे, व्यापारी दिनकर पोवळे दाखवण्यात आलेली आहे. गावातल्या अंबीतखिंड पाझर तलावातला गाळ काढण्याचं काम ग्रामपंचायतीकडून दाखवण्यात आलंय. गेल्या वर्षी 22 मे पासून 18 जूनपर्यंत हे काम झाल्याची कागदपत्र तयार करण्यात आली. त्यासाठी 3 लाख 51 हजार रुपये खर्च दाखवण्यात आला. प्रत्यक्ष तळ्यातून एक थोडासुद्धा गाळ काढण्यात आला नाही. विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेतून हे काम केल्याचं दाखवण्यात आलंय. त्यासाठी मजुरांची चक्क खोटी नावं हजेरीपत्रकात घुसवण्यात आली. एक नजर टाकूया या कामावर

close