पुण्यात 1 किलो ब्राऊन शुगरसह 5 जणांना अटक

July 20, 2012 3:18 PM0 commentsViews: 2

20 जुलै

पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत पुण्यातील संगमवाडी ब्रिजजवळ 21 लाख 75 हजार रूपये किमतीची ब्राऊन शुगर हस्तगत केली आहे. 1 किलो 450 ग्रॅम ब्राऊन शुगरसह सप्लायर राजकुमार मुथ्थुस्वामी देवेंद्र याच्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राजकुमार हा मुंबईतील सायन कोळीवाड्याचा राहणार असून पहिल्यांदाच अमली पदार्थ पुरवणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांनी यश आलंय.

close