‘विराट’ खेळीने, भारताची विजयी सलामी

July 21, 2012 1:15 PM0 commentsViews: 4

21 जुलै

भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळवल्या जात असलेल्या पाच वन डे सीरिजमध्ये भारताने विजयी सलामी देत श्रीलंकेला 21 धावांनी हरवले आहे. भारताने दिलेल्या 315 धावांचा पाठलाग करत श्रीलंका 9 विकेटवर 293 धावा करु शकला.भारताने पहिली बॅटिंग करत 6 विकेट गमावत 314 रन्सचा डोंगर उभा केला. विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारतानं मोठा स्कोर उभारला. कोहलीनं 113 बॉलमध्ये 109 रन्स केले तर वीरेंद्र सेहवागची सेंच्युरी मात्र थोडक्यात हुकली सेहवाग 96 रन्सवर रनआऊट झाला. भारताने दिलेल्या 315 धावांचा पाठलाग करत श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. 132 रन्समध्ये त्यांचे चार बॅट्समन आऊट झालेत. इरफान पठाणने दिलशानला आऊट करत लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विननं थरंगाला धक्का दिला. तर यादवनं चंडिमलला आऊट केलं. नमन ओझानं जयवर्धनेचा अडथळा दुर केला. संगकाराने मात्र हाफ सेंच्युरी ठोकत श्रीलंकेचा डाव सावरण्याच प्रयत्न केला. पण अखेरीस लंकेला 21 धावांनी पराभव पत्कारावा लागला.

close