पुण्यात कत्तलखान्याच्या विरोधात पालिकेवर मोर्चा

July 20, 2012 3:22 PM0 commentsViews: 2

20 जुलै

पुण्यातील कोंढवा येथील कत्तलखान्याच्या खाजगीकरणाचा मुद्दा आता चांगलाच गाजू लागला आहे. या खासगीकरणास वारकरी संघटना तसेच जैन धर्मीयांच्या संघटनांनी विरोध केला आहे. वारकरी संघटनेनं महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शनही केली. तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्येही कत्तलखान्याच्या खाजगीकरणावरून फूट पडली. काँग्रेस – राष्ट्रवादी – मनसेनं एकत्र येत स्थायी समितीच्या बैठकीत खाजगीकरणाचा प्रस्ताव आणखी 15 दिवस पुढं ढकलला. तर भाजप – सेनेनं हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. कोंढवा भागात असलेल्या पुण्यातल्या या एकमेव कत्तलखान्याच्या खाजगीकरमाचा विषय या आधीही 3 ते 4 वेळा पुढं ढकलला गेला आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ-पॅकबंद मटण मिळेल असा काँग्रेस राष्ट्रवादीचा दावा आहे तर विरोधकांचा याठिकाणी गो-हत्या होतील तसेच खाजगीकरमामुळे कत्तल करण्याच्या जनावरांच्या संख्येत वाढ होईल असा दावा आहे.

close