मालेगाव स्फोटाशी काही संबंध नाही – दयानंद पाडे

November 26, 2008 11:49 AM0 commentsViews: 4

26 नोव्हेंबरमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातला आरोपी दयानंद पांडे यानं आपला मालेगाव स्फोटाशी काही संबंध नाही, असं मोक्का कोर्टाला सांगितलं.एटीएसनं त्याला मोक्का कोर्टात हजर केलं होतं. मोक्का कोर्टानं 1 डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी दिली. अभिनव भारत या संघटनेच्या तीन बैठकांना आपण हजर होतो. पण त्यात मालेगाव स्फोटांविषयी कसलीही चर्चा झाली नाही, असं पांडेनं कोर्टात सांगितलं. साध्वी आणि पुरोहितच्या संपर्कात राहणं ही माझी चूक झाली, असंही तो कोर्टात म्हणाला. कोठडीत भगवे कपडे घालण्याची आणि दाढी करण्याची परवानगीही मागितली.

close