अबू जुंदल मुंबई पोलिसांच्या ताब्यात

July 20, 2012 5:14 PM0 commentsViews: 1

20 जुलैमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला अतिरेकी अबू जुंदलची कोठडी मुंबई एटीएसला मिळाली आहे. जुंदल दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या ताब्यात होता. दिल्ली पोलिसांनी जुंदलची कस्टडी वाढवून मागितली. पण दिल्ली कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली. मुंबई हल्ल्यासोबतच औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण, पुणे जर्मन बेकरी बाँम्बस्फोट प्रकरणात जुंदल एटीएसला हवा होता. त्याची चौकशी संपल्यानंतर त्याला पुन्हा दिल्लीत पाठवण्यात येईल. एनआयएल सुद्धा जुंदलची चौकशी करणार आहे.

close