काँग्रेसच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांविरोधात माणिकराव ठाकरेंकडे तक्रार

July 24, 2012 8:54 AM0 commentsViews: 4

24 जुलै

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराजीचं खरं दुखणं राज्यात असल्याचं स्पष्ट झालंय. अशातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहयोगी सदस्य आमदारांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंकडे तक्रार केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या 62 आमदारांच्या सह्यांचं पत्र माणिकराव ठाकरे यांच्याकडे शनिवारी पोहोचलंय. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आमदारांना वेळ द्यावा, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, त्यांच्या मतदारसंघातली विकासकामे मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आवाहन आमदारांनी प्रदेशाध्यक्षांना केलंय. आमदारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं असं पक्षानं मुख्यमंत्र्यांना सांगावं अशी विनंतीही आमदारांनी केली आहे.

close